Friday, November 25, 2005

खोली

अस्ताव्यस्त पसरलेली खोली एकदाची आवरून झाली. साधारणपणे माझ्या खोलीचे वर्णन करायचे झाले तर असे सांगता येईल. खुर्चीवर, पलंगावर, जमीनीवर (थोडक्यात सांगायचे तर खुंटी सोडून ईतर सगळीकडे) पडलेले कपड्यांचे बोळे, टेबलवर, गादीच्या कडे कपारीत घुसलेली पुस्तके. एखाद्या कोपर्‍यात कायम "तयार" असलेली माझी traveling bag. कॅसेटसचा कोलमडलेला ढिगारा. कवर शिवाय बेघर झालेल्या अनेक कॅसेट्स. स्वयंपाकघरातून इम्पोर्ट झालेले काही खाऊचे डबे. टेबलावरच पसरलेली बिनकामाची अनेक कागदपत्रे. आणि या सगळ्यामधे माझे सगळे नीट सुरू आहे ना हे मिशा फेंदारून बघायला येणारे एखादे झुरळ.

या सर्व वस्तूंना त्यांची योग्य जागा दाखवायचे काम मी अधुनमधून करत असतो पण तरी रविवारी आवरलेली खोली सोमवारी सकाळी पुन्हा पहिले सारखीच झाली असते.

पण आज आवरलेली खोली आता उद्या पसरणार नाही. उद्या पासून तिच्या कायापालटाचे काम सुरू. भिंतींना नवा रंग लागेल. नवे फर्नीचर येईल. जमिनीवरची गादी जाऊन किन्ग साईझ डबलबेड येईल. खोली कशी "एलीगन्ट" दिसेल याचे सुरेख चित्र डोळ्यापुढे उभे राहते आहे. पण त्याबरोबरच वर्षानुवर्ष वापरलेले स्टडी टेबल असणार नाही. कपड्याचे बोळे कोंबायचे कपाट असणार नाही. रीबॉक ची मॉडेल, गणपती आणि आयफेल टॉवर अशी एकमेकांशी अजिबात संबन्ध नसलेली पोस्टर्स भिंतीवर एकशेजारी असणार नाहीत ना त्यांच्या चिकट्पट्ट्यांचे डाग. या पुढे या गोष्टी असणार नाहीत. आणि त्या बरोबरच "माझी" खोली सुद्धा नसेल. जी नविन खोली असेल ती "आमची" बेडरूम असेल. (ही गोष्ट मनाला गुदगुल्या करणारी असली तरी आता यापुढे आयुष्यभर सगळे शेअर करायचे ही जाणिव अशा एखाद्या क्षणी खटकन टोचतेच!)

3 Comments:

Blogger Tulip said...

इतका पसारा लग्ना नंतर घातलास तर नक्कीच खरडपट्टी निघणार तुझी :-P .
btw ती शेअर कराव लागेल ह्या बद्दलची टोचणी पटली मला पण. मला तर माझ्या टॉवेल पण हात लावलेला कोणी चालत नाही. कस काय लग्ना नंतर हे वस्तूंच शेअरीग शक्य होत असेल? आणि स्वत : चा वेळ आणि स्पेस शेअर करावा लागणे हे तर अजूनच कठीण. लिहीत रहा. काही टीप्स मिळत जातील आम्हाला पण .

12:43 AM  
Blogger me_kon said...

Kuni vachte aahe tar. Thanx for the comment Tulip.

3:38 AM  
Blogger Krupa said...

Store Room to Bed room

Mazya nawaryachya room aksharshaha store room hoti gharachyanchi... ani ticha kaya palat sudha same hya padhatina zala...single cot, PC table, chotasa lokhandi kapat jaun chakachak Bedroom zali. tarihi adhun madhun nawaryahcya angat june ware yetat..ani room astawyast hote.. Mag mi off madhun ghari aalyawar aadhi room awarun to aalyawar "Store room to bed room .... Service charges Sir"...asa mhanun hat pudhe karate.
Rojachya day to day life madhalya simple pan kadhi kadhi manala sparsh karanarya bhawana mast lihitos..
Lihit raha tu...
Lihit raha....

3:09 AM  

Post a Comment

<< Home